दिशा नावीन्यपूर्ण शिक्षणाची !!

आज आपण आपल्या पाल्याच्या विकासासाठी जमेल ते करतो. मग ते काही का असेना शिक्षणासाठी क्लासेस, सी.डी.ज्, व्हिडीओज आणि बरेच काही. त्याच्यामागे आपण दिवसभर लागतो. हा क्लास झाला की तो क्लास. हे सर्व करुन देखील त्याची अभ्यासाची गोडी, बौद्धिक क्षमता, आकलन क्षमता वाढत आहे का? याचा आपल्याला खरच आढावा मिळतो का? आता गृहपाठाचच घ्या ना. तो मुलं कसा सोडवतात हे महत्वाचे राहत नाही. फक्त पूर्ण केला का नाही ही गोष्ट महत्वाची बनते. त्यावरून त्याच्या ना आकलन क्षमतेची , ना बुद्धिमत्तेची, ना विकासाची कशाचिच पावती मिळत नाही.

या सर्व मुद्द्यांवर मात करण्यासाठी बनविलेला आविष्कार म्हणजेच रेझ. रेझ हे माहितीपासून ज्ञान, ज्ञानापासून बुद्धिमत्ता वाढविणारे एकमेव तंत्रज्ञान आहे. तुमच्या पाल्याच्या विकासासाठीच नाही तर त्याची अभ्यासाची गोडी वाढण्यासाठी, अभ्यासाला ओझे नाही तर खेळ बनविण्यासाठी तयार केले गेले आहे. आता हेच बघा ना मुलांना खेळ किती प्रिय असतात जिथे जाईल तिथे खेळ. मग तो मोबाइल मध्ये असो वा कॉम्प्युटर मध्ये. जर याच ठिकाणी त्यांना चालता बोलता अभ्यास करता आला तर...शिक्षण मनोरंजक करता आले तर...!!! होय रेझ हे सर्व शक्य करते.

रेझ मध्ये पाल्याचाच नाही तर पालकांचाही विचार केलेला आहे. रेझ द्वारे तुम्ही आपल्या पाल्याच्या विकासाचा सहज आढावा घेऊ शकता, विषयापासून धड्यापर्यंत, धड्यापासून अगदी प्रश्नांपर्यंत. यामुळे आपला पाल्य कोणत्या विषयामध्ये किंवा विषयाच्या कोणत्या धड्यामध्ये कमकुवत आहे हे लगेच समजते. व वेळीच आपण त्याच्याकडून योग्य तो प्रयत्न करून घेऊ शकतो. हे प्रयत्न खरच सार्थ झाले आहेत का? हे तपासण्यासाठी Give Me Test हा विशेष पर्याय रेझ मध्ये उपलब्ध आहे.